ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विना अनुदानित शाळा महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विना अनुदानित शाळा महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान

शहर : मुंबई

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील कायम विना अनूदानित शाळा कृती समितीच उपोषण सुरू आहे.  जीआर निघून 100 टक्के अनुदान मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्र शिक्षकांनी घेतला होता. पोलीसानी केलेल्या लाठीमारानंतर शिक्षकांनी आंदोलन अधिक तीव्र केले. तेव्हा जाग आलेल्या राज्य सरकारने शिक्षकांच्या मागण्यांबाबत मोठा निर्णय घेतला. विना अनुदानित शाळां महाविद्यालयांना 20 टक्के दिले जाणार आहे. तर ज्या शाळांना आधीच 20 टक्के अनुदान दिल होत. त्याच अनुदान आता 40 टक्के करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी दिली. 

मात्र शिक्षणमंत्र्यांनी लिखित स्वरुपात दिल्याशिवाय आंदोलन स्थगित होणार नाही आणि विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेची प्रतीक्षा करू, अशी प्रतिक्रिया शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे, तर लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन स्थळ सोडणार नाही, अशी  भूमिका आंदोलक शिक्षकांनी घेतले आहे.

मागे

लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल
लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

अप्रमाणित मिश्र खताचे उत्पादन करणार्‍या लोकमंगल बायोटेक कंपणीच्या संचाल....

अधिक वाचा

पुढे  

बेस्ट कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता
बेस्ट कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

बेस्ट कामगारांच्या मागण्यासंदर्भात शिवसेनेने केलेल्या वाटाघाटी बेस्ट सं....

Read more