By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तेहरान, इराण - युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला होता की ते पाडण्यात आलं होत याविषयी सगळ्यांनाच संभ्रम होता. पण आता याला पूर्णविराम मिळाला आहे. युक्रेनच्या विमान अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमान मानवी चूक होती. तसेच ते क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडलं होत अशी कबुली इराणी लष्करानं दिली आहे. इराणच्या सरकारी माध्यमानं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
युक्रेनचे जे विमान बुधवारी बुधवारी अपघातग्रस्त झाले ते प्रत्यक्षात पाडल्याची गुप्तचर माहिती हाती आली आहे. हे विमान तेहरान येथील विमानतळावरून उडल्यानंतर कोसळलं होतं. या अपघातात १७६ जण ठार झाले तर, त्यात कॅनडाच्या ६३ नागरिकांचा समावेश होता.
Iran state TV, citing military, says country 'unintentionally' shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020
दरम्यान, या अपघाताची चित्रफिती हाती आली असून हे विमान पाडण्यात आल्याचे त्यात दिसून आले आहे. त्याआधारे थ्रुडू यांनी आरोप केला होता तसेच त्यांच्या आरोपाला पाश्चिमात्य नेत्यांनी पाठींबा दिला होता. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ते विमान पडले याचे पुरावे आहेत पण त्यात त्यांचा हेतू विमान पाडायचं आहे असा दिसत नाही, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन म्हणाले होते. तर इराणची दोन क्षेपणास्त्र विमानावर धडकली असावी त्यामुळे स्फोट झाला, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील गोकुळ शि....
अधिक वाचा