By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 08:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांना काल केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी साल २०२० साठीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा आणि उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरु झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
विशेष पोलीस पदकासाठी देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली असून यात केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाचे १५, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी १०, उत्तर प्रदेशातील ८, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २१ महिलांचा समावेश आहे.
.@HMOIndia ने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील १२१ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्ष २०२० साठीचे 'विशेष पोलीस पदक’
मागे
बीएमसी आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स, खाजगी सुरक्षारक्षक नेमल्याने महापौरही चकित
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर स....
अधिक वाचा