ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Unlock 4 | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 09:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Unlock 4 | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

शहर : देश

1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून अनलॉकचा पुढचा टप्पा सुरु होतोय. अनलॉक 4 साठी केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. त्यात आतापर्यंत बंद असलेल्या मेट्रो सेवेला काही प्रमाणात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे तशा पद्धतीची मागणी केली होती.

कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता टप्प्याटप्प्याने अनलॉची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अनलॉकचे 3 टप्पे पूर्ण झाले आहे. 31 ऑगस्टला अनलॉक 3 संपणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 सुरु होणार आहे. यानुसार अनेक गोष्टींमध्ये सुट मिळण्याची शक्यता आहे. यात मोठ्या शहरांमधील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती मिळत आहे.

शाळा, कॉलेजबद्दल निर्णय नाही

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर, शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अनलॉक 3 दरम्यान घेण्यात आला होता. त्यामुळे शाळा, कॉलेज संदर्भात अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान, राज्यात सप्टेंबरपासून शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.

धार्मिक स्थळ उघडणार का?

संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. यामध्ये देशातील मंदिरांबरोबरच सर्व गर्दीची ठिकणे बंद करण्यात आली होती. गेल्या 5 महिन्यांपासून असणारे लॉकडाऊन आता शिथील करण्यात येत आहे. मात्र, अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

नियम अटी घालून मंदिरं उघडण्याची परवानगी द्यावी

महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या दररोज मंदिरांमध्ये नित्यनियम भजन हरिपाठ करणारे लाखो मंडळी लॉकडाऊनमुळे गेली चार महिने अत्यंत अस्वस्थ आहेत. राज्य शासनाने अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. तर दुसर्या बाजूला राज्यातील छोट्या छोट्या मंदिरांना मात्र अद्यापही कुलूप लावण्यात आलेलं आहे. राज्य सरकारने ही छोटी मंदिर सुरू करण्याची परवानगी द्यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने तोंडाला मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटोकाट पालन करुन मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती ती वारकरी मंडळाने केलेली आहे.

 

मागे

विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर; पोलिसांत तक्रार दाखल
विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर; पोलिसांत तक्रार दाखल

ज्या पुण्यामधून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोव....

अधिक वाचा

पुढे  

महाड इमारत दुर्घटना : शक्य ती सर्व मदत करणार - पंतप्रधान मोदी
महाड इमारत दुर्घटना : शक्य ती सर्व मदत करणार - पंतप्रधान मोदी

रायगड जिल्ह्यातील (Raigad)महाड शहरात (Mahad)झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्र....

Read more