By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 07:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : lucknow
लखनऊ - उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांवर उपचार करणाया डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. बलात्कार पीडितेच्या वडिलांना मारहाण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्याचवेळी डॉ. प्रशांत उपाध्याय आपत्कालीन पारिस्थितीत होते आणि पीडित मुलीच्या वडिलांना तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर उपाध्याय यांना काही काळाकरिता निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, ब-याच काळानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. यावेळी, यावेळी त्यांना फतेहपूर येथे तैनात करण्यात आले होते. खरंतर उद्या (१४ जानेवारी) या प्रकरणातील खटल्याची सुनावणी तिस हजारी कोर्टात होणार आहे. परंतु, या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वीच त्यांचा संशयास्पद स्थितीस मृत्यू होणे हे सर्वांसाठीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले असल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर उपाध्याय यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या मृत्युमागे हेही कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच महेंद्र सिंह यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असून त्यांना आणखी उपचाराची आवश्यकता नसल्याचे अहवाल एम्सने सुप्रीम कोर्टात नमूद केले होते. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार कुलदीपसिंग सेंगरला दिल्ली उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या कोर्टाने गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच कोर्टानेही २५ लाखांचा दंड ठोठावला. यापैकी पीडित मुलीला १० लाख आणि फिर्यादीला पंधरा लाख रुपये देण्यात आले आहेत.
श्रीनगर - जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचे छुपे आणि भ्याड हल्ले सुरू....
अधिक वाचा