ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रियंका गांधींशी गैरवर्तन; सर्वच स्तरातून टीकेची झोड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 11:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रियंका गांधींशी गैरवर्तन; सर्वच स्तरातून टीकेची झोड

शहर : देश

उत्तर प्रदेश पोलिसांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी निघाल्या होत्या. यावेळी यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींनी गैरवर्तन केल्याचा एक फोटो समोर आला आहे. कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक फोटा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दिल्ली आणि नोएडा प्लायओव्हरवर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केली. यावेळी एक पोलीस प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचे कपडे खेचताना दिसत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृत्याबद्दल देशभर पडसाद उमटू लागले आहेत.

अलका लांबा यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करत,, मी निशब्द आहे... असं म्हटलं आहे.