By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
रायगड मधील उरण येथे असलेल्या ओएनजीसी गॅस प्लांटला आज सकाळी 7 च्या सुमारास आग लागली आहे. आग वाढत गेल्याने जेएनपीटी व ओएनजीसी अग्निशमन दलाला कळविण्यात आले. ह्या दरम्यान 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची शंका आहे.
ओएनजीसीच्या प्लांट सीएफयू 2 या भागात रसायनगळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अद्द्यापी आग विझविण्याचे काम चालू आहे. द्रोणागिरी, पनवेल, नेरूळ येथील अग्निशमन दलालाही बोलविण्यात आले आहे. पाऊस सुरू असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला वेळ लागत आहे.
आगीमुळे काही कामगार घटनास्थळी अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्लांट मधील आग व धुराच्या लोळा मुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ओएनजीसी च्या या प्रकल्पापासून नागरिकांना 1 किमी परिसत प्रवेश बंदी केली आहे.आगीमुळे उरण प्लांट मधील गॅस हजिरा प्लांट मध्ये वळविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान इंधन प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही असेही सांगण्यात आले आहे.
भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात श्री गजाननाची विध....
अधिक वाचा