By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
इराकच्या बगदादमध्ये अमेरिकेने आज पुन्हा एक हवाई हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी आहेत.
अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. या वाहनांमधून प्रवास करणाऱया सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी चा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे.
गुरुवारी रात्रीही अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात इराकचा मेजर जनरल कासिम सुलेमानचा खात्मा झाला होता.
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिका ईराणसोबत युद्ध करू इच्छित नाही. परंतु, जर इस्लामिक राष्ट्राने प्रत्युत्तर म्हणून काही कारवाई केली तर अमेरिका याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. ट्रम्पच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेने आज शनिवारी पुन्हा एकदा हवाई हल्ला केला.
पुणे- गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संदेश घेऊन सम....
अधिक वाचा