ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमेरिकेचे पाकवर निर्बंध, व्हिसाबंदीचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमेरिकेचे पाकवर निर्बंध, व्हिसाबंदीचा इशारा

शहर : विदेश

अर्थव्यवस्था डबघाईला गेली असताना पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसाबंदी केली जाईल, असा इशारा अेरिकेने दिला आहे. या व्हिसाबंदीची सुरुवात ही पाकच्या वरिष्ठ अधिकार्यांपासून होईल, असेही अेरिकेने बजावले आहे.

व्हिसा संपूनही शेकडो पाकिस्तानी नागरिक अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. या निर्वासित नागरिकांना पाकिस्तानने कायदेशात घेऊन जावे, असे अमेरिकेने कळवले होते. पण पाकिस्तानने निर्वासित झालेल्या अमेरिकेतील आपल्या नागरिकांना परत घेण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने पाकिस्तानवर निर्बंध घातले आहेत. तसेच पाकिस्तानच्यानागरिकांना व्हिसाबंदी करण्याचा इशारा दिला आहे.

व्हिसा संपल्याने अमेरिकेत निर्वासित झालेल्या आपल्या नागरिकांना जे देश परत घेत नाहीत, अशा देशांची यादी अेरिकेने केली आहे. आता पाकिस्तानचाही त्या 10 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. पण पाकिस्तानच्या बाबतीत अमेरिकेने काहीसे नरमाईचे धोरण घेतले आहे. अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावाससंबंधी कामावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. हा अमेरिका आणि पाकिस्तानमधील सरकारांचा द्वीपक्षीय मुद्दा आहे आणि सध्यातरी अमेरिका अधिक खोलात जाणार नाही.

मागे

मतदान पूर्ण होताच  पुण्यात पुन्हा पाणी कपात
मतदान पूर्ण होताच पुण्यात पुन्हा पाणी कपात

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दीड-दोन महिने आठवड्यातील प्रत्येक गुर....

अधिक वाचा

पुढे  

दुष्काळी उपाययोजना राबवण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
दुष्काळी उपाययोजना राबवण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

दुष्काळामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र चारा आणि पाणीटंचाईचा सामना....

Read more