By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 01:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
माटूंगा रोडवरील पूलानंतर आता डोंबिवलीतही धोकादायक बवलेल्या पादचारी पूलाचा नागरिक वापर करत असल्याचा प्रकार समोर आलाय. माञ, रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जातय. डोंबिवलीच्या गणेश मंदिराजवळ हा पूल असून तो डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडतो. तर, जवळपास 30 35 वर्ष जुना असलेला हा पूल जीर्ण झाला असून ठिकठिकाणी पुलाची अवस्था जर्जर झालीय. त्यामूळे रेल्वेनं काही दिवसापूर्वी हा पूल ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आसल्याचे फलक याठिकाणी लावले आहेत. तर, पुलावरून नागरीकांनी जाऊ नये. यासाठी पञे देखील लावल्यात आले आहेत. माञ, याठिकाणी एकही सुरक्षापक्षक नसल्यानं नागरिकांकडून या पूलाचा वापर सुरू आहे. त्यामूळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेचं याकडे लक्ष जाणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.