ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमेरिकेची भारताला २४ हंटर हेलिकॉप्टर देण्यास मंजूरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमेरिकेची भारताला २४ हंटर हेलिकॉप्टर देण्यास मंजूरी

शहर : विदेश

अमेरिकेने . अब्ज डॉलर्सला भारताला २४ 'एचएच ६० 'रोमियो' सी हॉक' हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजूरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला या हंटर हेलिकॉप्टरची आवश्यकता होती. लॉकहीड मार्टिनद्वारा निर्मित हे हेलिकॉप्टर पाणबुड्या आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर समुद्रात शोध घेण्यासाठी तसेच बचाव कामासाठी उपयोगी आहे.

ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी २४ 'एमएच-६० आर' या बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजूरी दिली आहे. हे हेलिकॉप्टर भारतीय सुरक्षा दलांना पाणबुडी आणि पाणबुडीविरोधी युद्ध मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यास सक्षम करतील. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रस्तावित विक्रीच्या मदतीने भारत आणि अमेरिकेच्या संबंधात सुधारणा करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले आहे.

या हेलिकॉप्टर अंदाजे खर्च . अब्ज डॉलर्स इतका आहे. यामुळे भारताला प्रादेशिक भागांतील धोक्यांपासून मदत मिळणार आहे. तसेच सुरक्षा मजबूत करण्यासही मदत मिळणार आहे. हिंद पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशात राजकीय स्थिरता, शांती तसेच आर्थिक प्रगती करण्यासाठी या हेलिकॉप्टरच्या विक्रीमुळे मोठ्या संरक्षण भागीदारांची सुरक्षा स्थिती सुधारण्यास मदत होईल. या हेलिकॉप्टर्सना जगातील सर्वात अत्याधुनिक सागरी हेलिकॉप्टर मानले जात आहे. हिंदी महासागरात चीनची आक्रमकता लक्षात घेता भारतासाठी या हेलिकॉप्टरची मदत होणार आहे.

मागे

पुलांचे ऑडिट, दुरुस्तीसंदर्भात नव्याने धोरण आखा, उच्च न्यायालय
पुलांचे ऑडिट, दुरुस्तीसंदर्भात नव्याने धोरण आखा, उच्च न्यायालय

सीएसएमटीवरील हिमालय पूल दुर्घटना ही डोळे उघडणारी घटना आहे, असा विचार करा, अस....

अधिक वाचा

पुढे  

पेटीएमकडून नवीन सेवा,ग्राहकांसाठी  घर बसल्या पैसे कमवण्याची संधी
पेटीएमकडून नवीन सेवा,ग्राहकांसाठी घर बसल्या पैसे कमवण्याची संधी

पेटीएम ई-वॉलेट कंपनी ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही ....

Read more