ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर प्रदेशमध्ये बस-ट्रक अपघातानंतर भीषण आग; २० जण ठार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर प्रदेशमध्ये बस-ट्रक अपघातानंतर भीषण आग; २० जण ठार

शहर : देश

       लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कानौजमध्ये शुक्रवारी रात्री बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली. या आगीत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी बस कन्नोजच्या गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मात्र, कानौजच्या जीटी रोडवर हा अपघात झाला.


       कानौजचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ४३ प्रवासी होते. यापैकी २६ प्रवासी हे गुरसहायगंज येथून तर १७ प्रवासी हे छिबरामऊ येथून बसले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात रात्री ८ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. हा अपघात झाला, तेव्हा बसमधील प्रवासी झोपले होते. त्यामुळे प्रवाशांना लगेचच बाहेर पडता आले नाही, अशी माहिती मिळाली आहे.

 


         दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले असून अपघातातील जखमी प्रवाशांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मृत्यू प्रवाशांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याशिवाय जखमींना देखील ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

 

 

मागे

एसटी बस-ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत १२ जखमी
एसटी बस-ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत १२ जखमी

        बुलढाणा - बुलढाणा जिल्हयातील संग्रामपूर गावात असलेल्या स्मशानभ....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर अपघातात गंभीर जखमी
शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर अपघातात गंभीर जखमी

        बुलडाणा - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायम....

Read more