By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 08:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आधीच महागाई, पेट्रोल दरवाढीचे चटके लागत असताना त्यात आणखी एक भर पडणार आहे. स्वयंपाकघरातील LPG सिलिंडर गॅसही आता महागणार असल्यानं खिशाला पुरता जाळ लागणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
1 डिसेंबर 2019 रोजी इंडियन ऑईल कॉरपोरेशनच्या बेवसाईटकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या महिन्यात दिल्लीत 14.02 किलोग्रामचा गॅस सब्सिडीवाले घरगुती गॅस सिलिंडरचे भाव 13.50 रुपयांनी वाढले होते.
डिसेंबर महिन्यात दिल्लीत गॅस-सब्सिडी घेणाऱ्यांना 681.50 रुपयांऐवजी आता 695 रुपये द्यावे लागणार आहेत. इंडियन ऑईल कॉरपोरेशनवरील वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता इथे सर्वाधित दर वाढल्याची माहिती मिळत आहे. 19.50 रुपये गॅस सिलिंडरची किंमत वाढली असून नागरिकांना कोलकाता इथे 706 रुपयांऐवजी आता 725 रुपये.50 पैसे मोजावे लागणार आहेत.
चेन्नईमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सिलिंडरचे दर 18 रुपयांनी वाढले आहेत. घरगुती गॅस म्हणजे सिलिंडर घेण्यासाठी आता 696 रुपयांऐवजी 714 रुपये प्रति सिलिंडर मोजावे लागणार आहेत. इतक्या सगळ्या ठिकाणी दर वाढले तर त्याचा परिणाम मुंबईवरही नक्की झाला असणार. अर्थातच मुंबईतही तब्बल 14 रुपयांनी सिलिंडरची किंमत वाढली आहे. 651 रुपयांऐवजी आता 665 रुपये प्रति सिलिंडर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.
अवकाळी पावसामुळे आधीच कांदा आणि भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. वाढते पेट्रोलचे दर, महागाई, भाज्यांच्या दरात होणाऱ्या वाढीसोबतच आता LPG घरगुती गॅस सिलिंडचेही दर 14 रुपयांनी वाढल्यामुळे गृहिणींना घाम फुटला आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात गृहिणींना गॅस जपून वापरावा लागणार आहे.
सत्तेवर येतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाचा आढावा घ्यायला सुरूवात ....
अधिक वाचा