ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2021 09:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

शहर : मुंबई

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. आज (15 जानेवारी) याच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Grampanchayat Election Voting) राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीचा 18 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. याकडे सर्वच  मतदार, उमेदवार आणि राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. मात्र, त्याआधी सर्वांकडूनच अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, काही मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र हे ओळखपत्र (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असणार आहे. मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

मतदान ओळखपत्राऐवजी तुम्ही इतर सरकारी ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यक्रमपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रं तुम्ही मतदानासाठी घेऊन जाऊ शकतात.

मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का हे पाहावे लागेल. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळेल. याबद्दल सरकारने काही सूचनाही दिल्या आहेत.

सूचना :

फोटो ओळखपत्रावर तुम्ही मतदान करु शकत नाही. यासाठी तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.

मतदान केंद्रावर मतदान पावती ओळखपत्रासोबत वरील दिलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?

पासपोर्ट

वाहन चालक परवाना

छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम

सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)

छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक

पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड

मनरेगा कार्यक्रमपत्रिका

कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज

खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र

आधारकार्ड

मागे

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य
राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राज....

अधिक वाचा

पुढे  

तबेल्यात अडकलेली पतंग काढताना घात, दलदलीत बुडून मुंबईत चिमुरड्याचा अंत
तबेल्यात अडकलेली पतंग काढताना घात, दलदलीत बुडून मुंबईत चिमुरड्याचा अंत

देशभरात मकरसंक्रांतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना मुंबईत गालबो....

Read more