ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-दिल्ली मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 04, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-दिल्ली मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार

शहर : मुंबई

देशातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस' सध्या दिल्ली ते वाराणसी अशी धावत आहे. पण आता भारतीय रेल्वेने ही एक्सप्रेस मुंबईत थांबवण्याचाही निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई ते दिल्ली चालणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला 16 तासांचा अवधी लागतोया ट्रेनमुळे मुंबई ते दिल्ली मार्गावरील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी वाचणार आहे.वंदे भारत एक्सप्रेस ही 160 किलोमीटर प्रति तास चालते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर 12 तासांत पूर्ण करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर देशभरात वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा झाली होती. दगडफेक्यांची समस्या ऐरणीवर आली. दगडफेकीपासून वाचण्यासाठी ट्रेनवर विशेष एंट्री स्पालिंग फिल्मची कोटींग लावण्यात आली. यासोबतच जनावरे रेल्वे ट्रॅकवर येण्याच्या घटना देखील वाढल्या होत्या. यावरही पर्याय शोधण्यात आला आहे. ट्रेनखाली येऊन जनावरे मरण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता ट्रेनच्या पुढच्या भागाचे डिझाईन बदलण्यात आले आहे. नव्या ट्रेनमध्ये फायबर ऐवजी एल्यूमिनियमचे कॅटल गार्ड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला होता.

दगडफेकीचा फटका

उत्तर प्रदेशच्या अछल्दा येथे बाजूने जाणाऱ्या डिब्रूगढ राजधानीखाली येऊन एका जनावराचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी डिब्रूगढ राजधानीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. ज्यात वंदे भारत एक्स्प्रेसलाही दगडफेकीचा फटका सहन करावा लागल्याचे उत्तर रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. या दगडफेकीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरच्या खिडकीच्या काचांवर तसेच एक्स्प्रेसच्या बाहेरील बाजूच्या काचांवरही दगडांचे तुकडे लागल्याने यात वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान झाले होते.

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्टे

  • वंदे भारत ही देशातील सर्वात पहिली इंजिनशिवाय चालणारी सर्वात गतिशील रेल्वे
  • ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार
  • रेल्वेचे काही सुटे भाग मात्र परदेशातून आयात
  • या रेल्वेत स्पेनहून मागवण्यात आलेले विशेष सीट लावण्यात आल्यात. या सीट ३६० डिग्री अंशात फिरेल
  • ही रेल्वे तयार करण्यासाठी १०० करोड रुपयांचा खर्च
  • या रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे उपलब्ध
  • संपूर्ण रेल्वेत एसी उपलब्ध
  • या रेल्वेत १६ कोच असून एकावेळी या रेल्वेतून ११०० हून अधिक प्रवासी
  • पहिल्या कोचमध्ये ड्रायव्हिंग सिस्टम लावण्यात आलंय तिथेच ४४ सीट
  • तर रेल्वेतील दोन एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये ५२ सीट
  • याशिवाय इतर कोचमध्ये ७८ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था

 

मागे

भारतात सात दिवस उशिरानं दाखल होणार मान्सून
भारतात सात दिवस उशिरानं दाखल होणार मान्सून

नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात येणारा मान्सून आता श्रीलंकेच्या दक्षिण क....

अधिक वाचा

पुढे  

म्हाडाचे घर दहा वर्षे विकता येणार नाही
म्हाडाचे घर दहा वर्षे विकता येणार नाही

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडामार्फत परवडणाऱ्या क....

Read more