ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट

शहर : देश

फायटर विमान राफेलच्या (Rafale) स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह (Shivangi Singh) सामिल झाल्या आहेत. शिवांगी सिंह वाराणसीतील राहणाऱ्या आहेत. शिवांगी यांच्या आई सीमा सिंह यांनी, मुलीने जे स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शिवांगी यांची सध्याची पोस्टिंग राजस्थानमध्ये आहे. एक महिन्याच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी पात्र झाल्यानंतर त्या राफेल संघात सहभागी झाल्या आहेत.

शिवांगी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून शालेय शिक्षणानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात (BHU)शिक्षण घेतल्याचं सीमा सिंह यांनी सांगितलं. शिवांगी बीएचयूमध्ये नॅशनल कॅडेट कोरमध्ये 7 एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. बीएचयूमध्ये 2013 ते 2015 पर्यंत त्या एनसीसी कॅडेट होत्या. तसंच 2013 मध्ये दिल्लीत स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये त्यांनी उत्तर प्रदेश टीमचं प्रतिनिधित्व केलं असल्याची माहिती, शिवांगीचे वडील कुमारेश्वर सिंह यांनी दिली.

2016मध्ये प्रशिक्षणासाठी त्या वायू सेना अकॅडमीमध्ये सामिल झाल्या. 16 डिसेंबर 2017 रोजी त्यांना हैदराबादमधील एअर फोर्स अकॅडमीमध्ये फायटर पायलटची पदवी मिळाली. हैदराबादमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर शिवांगी सध्या मिग-21च्या फायटर पायलट आहेत. त्यानंतर आता राफेलच्या पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट ठरल्या आहेत.

 

मागे

मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत १० ऑक्टोबरल....

अधिक वाचा

पुढे  

ONGC गॅस प्रकल्पात भीषण आग
ONGC गॅस प्रकल्पात भीषण आग

गुजरात येथे असणाऱ्या ONGC प्रकल्पातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ब....

Read more