ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आम्ही स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला; हैदराबाद पोलिसांचे स्पष्टीकरण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 06, 2019 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आम्ही स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला; हैदराबाद पोलिसांचे स्पष्टीकरण

शहर : देश

हैदराबाद हत्याकांडानंतर सायबराबाद पोलीसांकडून चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं. आज पहाटे ही घटना घडल्यानंतर 27 वर्षीय पीडित तरूणीला न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत. माझ्या मुलीच्या आत्म्यास शांती लाभेल अशी प्रतिक्रिया पीडित तरूणीच्या वडिलांनी दिली.

या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला सर्व प्रकार जगासमोर आणला. सायराबाद पोलीस आयुक्त वी सी सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेतली. 'आरोपींनी गुन्हा कबुल केल्यानंतर त्यांना घटनास्थळी नेण्यात आले. घटनास्थळावरून आणखी काही पुरावे मिळवण्याकरता त्यांना नेण्यात आलं. त्यावेळी आरोपींनी पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून घेतले आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याचे प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे'

सायराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश करण्यात आले. या एन्काऊंरची चौकशी करण्यात येणार आहे. या एन्काऊंटरचे पडसाद सगळीकडे पसरले आहे. या एन्काऊंरनंतर पीडित तरूणीला न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून येत आहेत. तसेच पोलिसांवर फुलांचा वर्षाव करून त्यांना राख्या बांधण्यात आल्या.तसेच पोलिसांना पेढे भरून त्यांचे कौतुक करण्यात आले. पोलिसांकडून झालेल्या या एन्काऊंटरचे पडसाद राजकारणातही पाहायला मिळाले. पीडित तरूणीच्या बहिणीने देखील पोलिसांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केलं आहे.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशीच त्यांची प्रतिमा आहे. दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सज्जनार यांच्याच नेतृत्वाखाली एका कारवाईमध्ये ऍसिड हल्ल्यातील आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. ज्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी रिघ लावत असत.

मागे

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी मानवधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश
हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी मानवधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस एन्काउंटरनंतर राष्ट्रीय म....

अधिक वाचा

पुढे  

Airtel ने घेतला मोठा निर्णय
Airtel ने घेतला मोठा निर्णय

टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानं रिचार्ज महागल....

Read more