ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय

शहर : सोलापूर

           सोलापूर - नवीन वर्षाची सुरवात परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्श दर्शनाने व्हावे यासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने एक जानेवारी पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निणर्य घेतला आहे. या करीता समितीने स्वतंत्र लॉकरची व्यव्यस्था केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठ्ल जोशी यांनी दिली आहे.


         सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता पर्यटनस्थळ ऐवजी तीर्थक्षेत्र या ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे. पंढरपूर येथे या वर्षी देखील भाविकांची गर्दी दिसून आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदिर समितीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली. ब्ल्यू डायमंड या फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा,सोळखांबी,प्रवेशद्वार आदी ठिकाणी आकर्षक फुलांनी सजविले आहे. या फुलांच्या आरासित देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.


          दरम्यान मंदिरात आल्यावर भाविक देवाचे, मंदिरात फोटो काढणे, मोबाईलवर बोलणे या सारखे प्रक्रार होऊ लागले. यामुळे आजपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे ६०० लॉकरची व्यवस्था केली आहे. यासाठी नाममात्र दोन रुपये आकारले जाणार आहेत.


         तसेच काही भाविकांचा मोबाईल नजरचुकीने बरोबर आला तर मंदिरात प्रवेश करतात त्या ठिकाणी २५० लॉकरची व्यवस्था केली आहे. येणार्याा भाविकांनी समितीला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे. जर कोणी मोबाईल आणला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असे मंदिर समितीने सांगितले आहे. एकंदरीत नवीन वर्षाच्या सुरवातीलाच पांढरी नगरी भाविकांनी फुलून गेली आहे.
 

मागे

कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन
कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन

          पुणे - कोरेगाव-भीमा इथे आज १ जानेवारी शौर्य दिनानिमित्ताने विज....

अधिक वाचा

पुढे  

१३९ क्रमांक आता ‘रेल मदत’ या अॅ पच्या माध्यमातून वापरता येणार
१३९ क्रमांक आता ‘रेल मदत’ या अॅ पच्या माध्यमातून वापरता येणार

            रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असलेले अनेक हेल्पलाइ....

Read more