ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2014 चा जाहीरनामा पाहताच अभिनेता अनुपम खेर गायब 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 05:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2014 चा जाहीरनामा पाहताच अभिनेता अनुपम खेर गायब 

शहर : chandigarh

लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आलेल्या अभिनेता आणि भाजपा खासदार किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांच्यावर पुन्हा एकदा नामुष्कीची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. एका दुकानदाराने अनुपम खेर यांना 2014 चा जाहीरनामाच दाखवला. तसेच, गत निवडणुकांवेळी दिलेल्या वचनांचं काय? असा प्रश्नही या दुकानदाराने अनुपम खेर यांना विचारला आहे. 


अनुपम खेर यांना दुकानदाराच्या या प्रश्नावर निशब्द होऊन परतावे लागले. हरयाणाच्या चंडीगढ या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी किरण खेर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आपल्या सहकार्‍यांसमवेत अनुपम खेर निवडणूक प्रचारासाठी मतदारसंघाचा दौरा करत होते. त्यावेळी, एका किरकोळ विक्री करणार्‍या दुकानदाराने अनुपम खेर यांना प्रश्न विचारून गोंधळात टाकले. या दुकानदाराने 2014 च्या निवडणुकांवेळीचा भाजपाचा जाहीरनामाच समोर केला. तसेच, गेल्या जाहीरनाम्यातील प्रश्न अद्याप सुटले नसल्याचे सांगितले. त्यावर, अनुपम खेर यांना अपमान सहन करावा लागल्याने ते तेथून परत फिरले.

मागे

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणार्‍या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत करा-प्रकाश आंबेडकर
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणार्‍या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत करा-प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत सध्या मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल ....

अधिक वाचा

पुढे  

जोडप्याने पहिल्यांदाच हुतात्म्यांना वंदन करून मगच केले लग्न 
जोडप्याने पहिल्यांदाच हुतात्म्यांना वंदन करून मगच केले लग्न 

पुणेमध्ये एक आनोखा विवाह सोहळ संपन्न झाला. या विवाह सोहळ्या दरम्यान जन्मभू....

Read more