By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जून महिना पावसाचा कोरडा गेला आणि मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते, मात्र ही कसर पावसाने जुलैमध्ये भरून काढली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, तानसा,मोडक सागर, यांच्यानंतर आता उर्वरित नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी संकट टळणार आहे. गेल्या काही दिवसात मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात आधी 12 जुलैला तुळशी तलाव भरून वाहू लागले.त्यानंतर 25 जुलैला तानसा धरण भरले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोडक सागर ही भरून वाहू लागला तर 27 जुलैला वैतरणाचे दरवाजे उघडण्यात आले. 29 जुलैला भातसाचे दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85.68 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
1ऑगस्ट पासून काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ सर्वांनाच ह....
अधिक वाचा