By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या विजय मल्ल्यावर ९ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याला जोरदार दणका बसला आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव कधीही होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेही कोर्टाने मल्ल्याची संपत्ती वसूल करण्याची बँकांना परवानगी दिली आहे.
ईडीनेही या वसुलीवर काहीच आक्षेप नसल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलच याबाबतचा निर्णय घेऊ शकतो, असं मल्ल्याच्या वकिलांनी आक्षेप घेताना म्हटलं होतं. मल्ल्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील करावं म्हणून विशेष न्यायालयाने त्यावर १८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. त्यावर विशेष न्यायालयाने आता हा निर्णय दिला असून मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे.
दरम्यान, भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून डिसेंबरमध्ये ब्रिटनमधील एका कोर्टात मल्ल्याने प्रत्यार्पणास आव्हान दिले होते. तिथे मल्ल्याच्या विरोधात निर्णय देताना कोर्टाने मल्ल्याला भारताच्या हवाली करण्यास परवानगी दिली होती.
भारताकडून प्रत्यार्पणाच्या अनुशंगाने ज्या काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, त्या सर्व समाधानकारक असल्याचेही कोर्टाने ही परवानगी देताना नमूद केले होते. मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून होते.
नागपूर - गेल्या वर्षी २०१९मध्ये देशात ११० वाघांचा मृत्यू झा....
अधिक वाचा