By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 07, 2019 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
22 जुलै पासून भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. चंद्रावर नियोजित कार्यक्रमानुसार उतरून 7 सप्टेंबरला भारत एक इतिहास रचणार होता. मात्र ऐन शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरसोबत संपर्क तुटला. आणि चंद्रयान 2 च्या मोहिमेत मोठा अडथळा निर्माण होऊन इतिहास होता होता राहिला.
मध्यरात्री 1.30 ते 2.30 वाजताच्या दरम्यान विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार होते. त्यानंतर 2 तासाने प्रज्ञान रोवर बाहेर येणार होते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. पंत प्रधान नरेंद्र मोदी ही खास ह्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या सोबत होते. तसेच इतर मान्यवरही ह्या घटनेकडे लक्ष होऊन ठेवून होते.
मात्र शेवटच्या टप्प्यात चंद्रापासून 2.1 किमी लांबीवर असताना विक्रम लँडरचा संपर्क अचानक तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञाची पूर्ण कसोटी लागली. अख्या जगाच लक्ष चंद्रयान 2 वर लागून होते. अजूनही 'विक्रम' सोबत संपर्क होऊ शकलेला नाही. इस्रोचे शास्त्रज्ञ माहिती विश्लेषण करून सातत्याने विक्रम लँडर सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.
This is Mission Control Centre. #VikramLander descent was as planned and normal performance was observed up to an altitude of 2.1 km. Subsequently, communication from Lander to the ground stations was lost. Data is being analyzed.#ISRO
— ISRO (@isro) September 6, 2019
यावेळी इस्रो प्रमुख के. सीवन यांना अश्रु अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना "मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे." असे म्हणून त्यांचा धीर दिला.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्य....
अधिक वाचा