ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चांद्रयान 2 मधील ऑर्बिटरपासून विक्रम लॅडर झाले वेगळे

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 03:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चांद्रयान 2 मधील ऑर्बिटरपासून विक्रम लॅडर झाले वेगळे

शहर : bangalore

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्वाकांक्षी मोहीम असलेले चंद्रयान 2 अगदी जवळ पोहोचले असून यानातील  ऑर्बिटरपासून विक्रम लॅडर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी अपेक्षेप्रमाणे यशस्वीरित्या वेगळे झाले. आता विक्रम लॅडरचा चंद्रभूमीवर उतरविण्याचा घटनाक्रम सुरू झाला आहे.

काल रविवारी चंद्रयान 2 यानाचे इंजिन 52 सेकंदासाठी प्रज्वलित करून अखेरच्या कक्षेतून चंद्राभोवतीच्या 119 किमी बाय 127 किमीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात इस्रोला यश आले होते. आज विक्रम लॅडर  ऑर्बिटरपासून वेगळे झाले. विक्रम लॅडर 7 सप्टेंबरला दक्षिण धृवावर पोहोचले. त्यावेळी हे लॅडर प्रत्यक्ष चंद्रभूमीवर उतरेल. तेव्हा भारताचा समावेश अमेरिका, रशिया आणि चीन या बड्या देशांच्या पंक्तीत होईल.

20 ऑगस्टला चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. तर 30 ऑगस्टला यानाने चंद्राच्या चौथ्या कक्षेत आणि 1 सप्टेंबरला 5 व्या कक्षेत प्रवेश केला होता. 23 दिवस पृथ्वीभोवती भ्रमण केल्यानंतर चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी यानाला 6 दिवस लागले होते. यानाने 26 ऑगस्टला दुसर्‍यांदा चंद्राच्या पृष्टभागाची छायाचित्रे पाठविली होती. ही छायाचित्रे 4 हजार 375 किमी अंतरावरुन यानाने घेतलेली होती.

 

मागे

गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ
गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. मुंबईत काल रात्री ....

अधिक वाचा

पुढे  

गणेशोत्सव 2019 : गोदावरी एक्सप्रेस मध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना
गणेशोत्सव 2019 : गोदावरी एक्सप्रेस मध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवानिमित आपल्यालाही श्री गणेशाचे दर्शन व्हावे, त्याची पूजा-अर्चा क....

Read more