ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे आमरण उपोषण मागे

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 08:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे आमरण उपोषण मागे

शहर : मुंबई

विमानतळ परिसर रहिवाशी एक्ता संघातर्फे मुंबई विमानतळ परिसरातील 80 हजार झोपडपट्टीच्या पुनर्वसन व इतर मागण्याकरिता 15 जुलै पासून सुंदर पाडमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  आमरण उपोषण विलेपार्ले येथील पोस्ट ऑफिस जवळ घेण्यात आले होते. विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता. विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकारी यांनी आज उपोषण स्थळाला भेट देऊन रहिवाश्यांच्या मागण्या पूर्ण करण्याविषयी आश्वासन दिल्यानंतर चार दिवसानी  हे उपोषण मागे घेतल्याचे सुंदर पाडमुख व समाज सेवक हजरत पठाण यांनी आज सांगितले.

घराच्या बदल्यात घर , दुकानाच्या बदल्यात दुकान द्यावे, 500 चौ. फू. चटई क्षेत्राची सदनिका मिळावी सांताक्रूझ, विले पार्ले, अंधेरी येथेच पुनर्वसन करून मिळावे , पुनर्वसन प्रकल्पाला स्वतंत्र आणि विशेष प्रकल्प जाहीर करावा अशा इतर प्रमुख मागण्या व समस्यासाठी हे आमरण उपोषण घेतले गेले होते.

"आमच्या मागण्या 45 दिवसात पूर्ण न झाल्यास किंवा अधिकार्‍यानी दिलेला शब्द न पाळल्यास एकता संघातर्फे अजून तीव्र आंदोलन करू' असा इशारा एकता संघातर्फे दिला आहे.

मागे

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 2 ऑगस्टला सुनावणी
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 2 ऑगस्टला सुनावणी

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्यातील राम जन्मभूमी वाद प्रकरणी सर....

अधिक वाचा

पुढे  

अति मद्यप्राशनामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू
अति मद्यप्राशनामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

चिंचणी गावातील देमनभाट येथे राहणारी पिंकी हरजी माढा या महिलेचा मृतदेह वरोर....

Read more