ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

शहर : मुंबई

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारे व्यक्तिच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला. पायलट तत्वावरील या उपक्रमाचा महापालिका अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

पुढे  

दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना
दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ....

Read more