By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोना लसीच्या चाचणीचे प्रयोग जगभरात सुरु जात आहेत. अशात ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोना लसीची चाचणी करताना एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी तशी माहिती दिली आहे.
अॅस्ट्रोजनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे या लसीची चाचणी बऱ्याच स्वयंसेवकांवर सुरु आहे. त्यांच्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ब्राझील सरकारने गोपनीयतेचे कारण देत मृत्यूबद्दल अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतर अॅस्ट्रोजनेका कंपनीला मोठा फटका बसला आहे. अॅस्ट्रोजनेका कंपनीचे शेअर्स जवळपास 1.7 टक्क्यांनी पडले आहेत.
ब्राझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सोओ पाओल विद्यापीठाने दिलेल्या माहितीप्रमाणे मृत्यू झालेला स्वयंसेवक हा ब्राझीलचाच रहिवासी आहे. सोओ पाओलो विद्यापीठाकडूनही कोरोनावर लस तयार करण्याचे काम सुरु आहे. ही लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात असून लवकरच ती सामन्यांसाठी उपलब्ध होणार असे सांगितले जात आहे.
ब्राझीलमध्ये सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड लाखांच्याही पुढे गेलाय. सध्या 1 लाख 54 हजार कोरोनाग्रस्त असून मृत्यूच्या बाबतीत ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात कोरोनावर लस तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. आगामी दीड महिन्यात कोरोनावर लस येऊ शकते असं वैज्ञानिक आणित तज्ज्ञांचं मत आहे. पण ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक तर्क लावले जात आहेत. कोरोना लसीच्या सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
अमेरिकेत एली लिली कंपनीच्या लशींची चाचाणी थांबवली
अमेरिकेतही कोरोनावर लस शोधन्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. एल लिली ( Eli Lilly) कंपनीतर्फे LY-CoV016, LY-CoV555 या दोन अॅन्टीबॉडीज तयार केल्या जात आहेत. त्यातील एका अॅन्टाबॉडीची ट्रायल अमेरिकेने थांबवली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीची चाचणीसुद्धा अमेरिकेने थांबवलेली आहे.
सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सोयाब....
अधिक वाचा