By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नोकरी धंद्यानिमित मुंबईत राहणार्या शेतकरी पूत्राला विट्ठालाच्या दर्शनासाठी वारी मध्ये सहभागी होता येत नाही. म्हणूनच मग असंख्य विठ्ठल भक्त मुंबईतील प्रतीपंढंरपूर मानल्या गेलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीला अलोट गर्दी करतात . आजहि वडाळ्याच्या विठ्ठल मंदिर परिसर विठ्ठल कामाच्या गजराणे दुमदुमून गेला आहे.
वडाल्यात आषाढी एकादशी निमित गुरुवारी मध्यरात्री पासूनच भाविक रांगेत उभे होते. मंदिर रात्रभर खुले अनेक भक्तांना दर्शन घेऊन नोकरी साठीही वेळेत जाता येते. आज या मंदिरात व्यसन मुक्ती प्रचार कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले आहे. नशाबंदी मंडळातर्फे यावेळी समुपदेशन करून व्यसनमुक्तिचा संदेश देण्यात येणार आहे. मुंबईच्या विविध भागातून येथे वारकरी दिडया पताका घेऊन पोहोचले आहेत. सर्व भाविकणाही विठ्ठल रुकमिनीचे दर्शन घेता यावे . त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वतोपरी उपाय करण्यात आले आहेत. शिवाय कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
विट्ठल दर्शनासोबतच मुंबईत अनेक ठिकाणी अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या रंगस्वर विभागाच्या वतीने आज सांयकाळी 6 वाजता 'संत संप्रदाय' हा विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. याशिवाय वांद्रे येथील रंग शारदा सभागृहातही सायंकाळी 6.30 वाजता आषाढ रंग मैफिलीचे आयोजन केले आहे. गायक अनिरुद्ध जोशी , सुवर्णा मातेगावकर, सोनाली कर्णिक आणि संजीव चिम्म्लगी यांच्या आवाजात विठू माऊली च्या अभंगाची ही मैफिल सजाणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वर 24 लाख रुप....
अधिक वाचा