By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : मुंबईत स्वस्त असलेले वाडिया रुग्णालय बंद करण्याचे चित्र माध्यमातून दिसत आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, रुग्णालयाच्या प्रशासन बैठकीनंतर सरकार कोणते निर्णय घेणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेने रुग्णालयाच्या मूळ करातील अटी आणि शर्तींचा विनयभंग केल्याचा आरोप ठेवूत आज महापौरांसोबत बैठक आयोजित केली असून रुग्णालयाच्या प्रशासनाचे म्हणणे ऐकूनच योग्य तो निर्णय घेण्यात येतील. वाडिया रुग्णालयात खाटांची संख्या अचानक कशी वाढली असावी? असा आरोप पालिकेच्या अधिकार्यांपनी केला. ठरवण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रमाणाच्या बाहेर जात असल्याचे पालिकेने टीका केली आहे.
दरम्यान, रुग्णालयाला पालिकेकडून १३५ कोटी रुपयाचे अनुदान येणार असल्याचे रुग्णालयाचे प्रशासनांनी सांगितले आहे. तर २० कोटीची अनुदान देणार असे पालिकेचे म्हणणे आहे. वाडिया रुग्णालय महिला रुग्णांना स्वस्तात सेवा देणारे एकमेव रुग्णालय आहे. महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान थांबवल्याने याचा परिणाम वाडिया रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांना होत आहे. तसेच यापेक्षाही वाईट परिस्थिति येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* बाल रुग्णालय आणि प्रसुती रुग्णालयातून वेतन घेणारे डॉक्टर
मिनी बोधनवाला (सी.ई.ओ) - (बाल रुग्णालय १,६१,९४२ पगार) (प्रसुती रुग्णालय १,५७,५१२ पगार)
रेनी वर्गीस (सी.पी.ओ) - (बाल रुग्णालय १,२४,४२२ पगार) (प्रसुती रुग्णालय ९९,२९८ पगार)
दिलीप शाह (सी.ए) - (बाल रुग्णालय ८०,२८० पगार) (प्रसुती रुग्णालय १,००,१२६ पगार)
विश्वनाथ गायकवाड (ए.ओ) - (बाल रुग्णालय ८९,१०० पगार) (प्रसुती रुग्णालय ८९,१०० पगार)
निरंजन गायकवाड (पी.ओ) - (बाल रुग्णालय ७१,२५३ पगार) (प्रसुती रुग्णालय ५४,९०० पगार)
सुहास पवार (एम.एस) - (बाल रुग्णालय १,३५,२१६ पगार) (प्रसुती रुग्णालय ६०,४५० पगार)
* बाल रुग्णालय आणि प्रसुती रुग्णालयातून पेन्शन घेणारे डॉक्टर
मिनू चोकशी - (बाल रुग्णालय १८,६०७ पगार) (प्रसुती रुग्णालय १८,६०७ पगार)
गंगाराम मोरे - (बाल रुग्णालय ६,१११ पगार) (प्रसुती रुग्णालय ६,१११ पगार)
आर.जे दारूवाला - (बाल रुग्णालय १५,७४६ पगार) (प्रसुती रुग्णालय १५,७४६ पगार)
एन.ए.पटेल - (बाल रुग्णालय २०,०५१ पगार) (प्रसुती रुग्णालय २०,०५१ पगार)
आर.जे.बोगा - (बाल रुग्णालय ११,८९४ पगार) (प्रसुती रुग्णालय ११,८९४ पगार)
नरेश राठोड - (बाल रुग्णालय १४,४३१ पगार) (प्रसुती रुग्णालय १४,४३१ पगार)
केरसी मोजीया - (बाल रुग्णालय ११,७१० पगार) (प्रसुती रुग्णालय ११,७१० पगार)
हिरजी चोकसी - (बाल रुग्णालय १४,३३५ पगार) (प्रसुती रुग्णालय १४,३३८ पगार)
संतोष सेट्टी - (बाल रुग्णालय १५,८८१ पगार) (प्रसुती रुग्णालय १५,८८१ पगार)
जावेद खान - (बाल रुग्णालय ८,५४६ पगार) (प्रसुती रुग्णालय ८,५४६ पगार)
लखनऊ - उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांवर उपचार क....
अधिक वाचा