By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आरामदायी आणि हवेशीर अशा बम्बार्डियर लोकल गाडय़ांची मध्य रेल्वे अजूनही प्रतीक्षाच करत आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत आठ लोकल टप्प्याटप्याने दाखल होण्यास जून २०१९ उजाडणार आहे. तर, या लोकल गाडय़ांच्या महिला डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा असेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय. एमयूटीपी-२ अंतर्गत पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ पर्यंत प्रशस्त आणि हवेशीर अशा ७२ बम्बार्डियर लोकल गाडय़ा दाखल झाल्या आहेत. त्यातील ४० लोकल मध्य रेल्वेला आणि ३२ लोकल पश्चिम रेल्वेवर येणार होत्या. मात्र तांत्रिक कारणास्तव या लोकल मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वेवर दाखल झाल्या. त्याबदल्यात पश्चिम रेल्वेवरील काही सिमेन्स लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यानंतर मध्य रेल्वेनेही त्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार ३४ बम्बार्डियर लोकल दाखल होणार होत्या. परंतु आतापर्यंत २६ लोकल दाखल झाल्या असून आणखी आठ बम्बार्डियर लोकलची मध्य रेल्वेला प्रतीक्षा आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासने आता मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर ५ टक्के ब....
अधिक वाचा