By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
पंढरपूर - भगवान जब देता है तब छप्पर फाडके देता है, हे वाक्य आपण बर्याच वेळा ऐकलं आहे. पण हेच वाक्य एका विठ्ठल भक्ताच्या बाबतीत खरं ठरलं आहे. पंढरीची वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या वारकरी भाविकाने विठ्ठल माऊलीच्या दर्शनानंतर घराकडे जाताना काढलेल्या १०० रुपयांच्या लॉटरी तिकीटाला चक्क ५० लाखाचे बक्षीस लागले. आता ५० लाख जिंकलेला तो भाग्यवान भाविक कोण याची लॉटरी विक्रेत्यासह अक्ख्या पंढरपूर शहराला उत्सुकता लागली आहे.
६ जानेवारीला पुत्रदा एकादशी होती. महिन्याची ही वारी पोहोचती करण्यासाठी हजारो वारकरी भाविक पंढरीत दाखल होत असतात. एका विठ्ठल भक्त वारकर्याने चौफाळा परिसरातील शोभा लॉटरी सेंटर मधून १०० रुपयांचे एक लॉटरी तिकीट विकत घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नाताळ नवीन वर्ष सोडतीचे हे तिकीट असून या लॉटरी सोडतीचा निकाल ८ जानेवारी रोजी लागला आहे. NY 02 43632 या क्रमांकाला प्रथम क्रमकांचे म्हणजे ५० लाखाचे बक्षीस लागले आहे. ५० लाखाचे बक्षीस मिळवणारा तो भाग्यवान कोण याची उत्सुकता पंढरीत शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल मंदिराकडे जाणार्या प्रदक्षिणा मार्गावरील चौफळ्यात आमचे लॉटरी दुकान आहे. कोणी अज्ञात वारकरी भाविकाने पुत्रदा एकादशीच्या दरम्यान हे तिकीट विकत घेतले होते. त्या भाविकाला ५० लाखांचे बक्षीस लागले आहे. तो लखपती भाविक कोण आहे याच्या आम्ही शोध घेत आहोत. असे लॉटरी विक्रेते सुरेश खोबरे यांनी म्हंटले आहे.
रत्नागिरी - कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच....
अधिक वाचा