By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा तसेच नायगाव-पाणजू खाडी पुलावरून लोकलप्रवासी निर्माल्याच्या पिशव्या नेहमी खाडीत फेकत असतात. खाडीमध्ये निर्माल्य फेकल्यामुळे त्यातील नारळाचा फटका डोक्याला लागून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील सफाळे आणि वैतरणा स्थानकादरम्यान वैतरणा खाडीपुलावर ही घटना घडली. रोहिणी विक्रांत पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे. बुधवारी डहाणूहून विरारच्या दिशेने येणार्या लोकलमधील एका प्रवाशाने निर्माल्याची पिशवी खाडीमध्ये फेकली. मात्र त्या पिशवीमधील नारळ वैतरणा खाडी पुलावरून पायी पायी जाणार्या रोहिणी पाटील यांच्या डोक्यात पडला. नरळाच्या जोरदार फटका बसल्याने जखमी झालेल्या रोहीणी चक्कर येऊन रेल्वे रुळाच्या बाजूला कोसळल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत चालणार्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी निर्माल्याच्या पिशव्या धावत्या लोकलमधून खाडीत फेकत असतात. याचा फटका आजूबाजूने चालणार्या नागरिकांना बसतो. त्यामुळे लोकलमधून निर्माल्य फेकण्यावर बंदी आणण्याची जोरदार मागणी होत आहे.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडि....
अधिक वाचा