ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेव्हा काँग्रेस नेत्याला निरोप देताना मोदींनी तीनदा अश्रू पुसले, 5 मिनिटे 15 सेकंद तुम्हाला ....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 06:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेव्हा काँग्रेस नेत्याला निरोप देताना मोदींनी तीनदा अश्रू पुसले, 5 मिनिटे 15 सेकंद तुम्हाला ....

शहर : देश

संसदेचं सध्या अधिवेशन सुरु आहे. दोन्ही सभागृहात भाषणांची लड सुरु आहे. पण राज्यसभेत आज चार खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Rajya Sabha Speech) यांचं जे रुप पहायला मिळालं ते ऐतिहासिक आहे. बऱ्याच काळापर्यंत ते लक्षात राहील असं आहे. एवढंच नाही तर मोदींचं संपूर्ण भाषण आपली राजकीय समज बदलणारं आहे. समृद्ध करणारं आहे. (Watch full speech of PM Narendra Modi praises Ghulam Nabi Azad gets emotional in Rajya Sabha )

मोदींना अश्रू अनावर का झाले?

राज्यसभेत आज जम्मू आणि काश्मीरच्या चार खासदारांना निरोप देण्यात आला. यात काँग्रेसचे राज्यसभेतले नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी चारही खासदारांबद्दल गौरवोदगार काढले. पण गुलाम नबी आझाद यांंचा गौरव करताना मात्र मोदी एवढे भावनावश झाले की एक वेळेस त्यांचा आवाज येणं बंद झालं. सभागृहात त्यावेळेस प्रचंड शांतता पसरली. मोदींची अशी अवस्था एक दोन मिनिटे नाही तर जवळपास पाच मिनिटं होती. मोदी आझादांबद्दल बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जवळपास तीन वेळेस मोदींनी अश्रू पुसले. दोन वेळेस पाणी घेत स्वत:ला सावरण्याचाही मोदींनी प्रयत्न केला. पण काँग्रेस नेत्याबद्दल बोलताना मोदींचे अश्रू थांबले नाहीत.

मोदींनी नेमकी कुठली घटना सांगितली?

आझाद यांचं काम कसं आहे याचं उदाहरण मोदींनी दिलं. ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि आझाद हे जम्मू आणि काश्मिरचे. त्यावेळेस काश्मीरमध्ये गुजराती पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या घटनेनंतर आझादांनी मला फोन केला त्यावेळेस आझाद फोनवरच रडत होते. स्वत:च्या घरातला माणूस गेल्यासारखं त्यांची अवस्था होती. ते मृतदेह आणि नातेवाईकांना परत गुजरातला आणण्यासाठी रात्री एअरपोर्टवर राहिले. सकाळीही त्यांनी मला फोन केला. सगळे व्यवस्थित पोहोचले का म्हणून विचारलं. या सगळ्या प्रसंगात आझाद एखाद्या कुटुंबातल्या सदस्यासारखे वागल्याचं मोदी म्हणाले. हा पूर्ण प्रसंग सांगतानाच मोदी भावनावश झाले.

मागे

‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक
‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक

राज्यसभेचा कार्यकाल संपल्यानंतर आपल्या निरोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्य....

अधिक वाचा

पुढे  

लोकलचं वेळापत्रक बदलण्याबाबत पुन्हा एकदा सकारात्मक संकेत
लोकलचं वेळापत्रक बदलण्याबाबत पुन्हा एकदा सकारात्मक संकेत

लोकांना हवं असलेल्या लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी (Mumbai....

Read more