ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदान पूर्ण होताच पुण्यात पुन्हा पाणी कपात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदान पूर्ण होताच  पुण्यात पुन्हा पाणी कपात

शहर : पुणे

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दीड-दोन महिने आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी असलेली पाणी पुरवठा बंद ठेवत असलेल्या पुणे महापालिकेकडून निवडणुका जाहीर होताच दर गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली होती. मात्र या निवडणूक अर्थात मुख्य मतदान पूर्ण होताच तापलेल्या उन्हाच्या तडाख्यामध्ये मनपा कडून अघोषित पाणी कपात सुरु करण्यात आली आहे. यामुळे येत्या गुरुवार दि. मे रोजी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण समस्या उभी राहिली आहे.शहराला पाणी पुरवठा करणार खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा शिल्लक असला तरी राज्य आणि जिल्ह्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यांपासूनच जलकेंद्र, पंपीग स्टेशन आणि पाईप लाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे ही पाणी कपात सुरु असते. यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे प्रमाण पंधरा दिवसांवरुन दर आठवड्याला पाणी पुरवठा बंद करण्यात येत होता.मात्र आता पुन्हा ही कपात लागू झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देखील निवडणूक प्रचार करतांना पाणी कपाती मुळे नागरिकांच्या रागाला सामोरे जावे लागले होते.

 

मागे

हिमालयावर हिममानवाच्या पावलाचे ठसे
हिमालयावर हिममानवाच्या पावलाचे ठसे

भारतीय सैन्याने पहिल्यांदा हिममानव यती अस्तित्वात असल्याची शक्यता वर्तवल....

अधिक वाचा

पुढे  

अमेरिकेचे पाकवर निर्बंध, व्हिसाबंदीचा इशारा
अमेरिकेचे पाकवर निर्बंध, व्हिसाबंदीचा इशारा

अर्थव्यवस्था डबघाईला गेली असताना पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसण्याची ....

Read more