By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 08:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांनाच आरक्षण नकोय, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. "महाराष्ट्रात 288 पैकी 182 श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसाठी इतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत," असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. pic.twitter.com/cPqRise2q7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 13, 2020
तसंच, गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांविरूद्ध स्वत:चा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असं आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केलं.मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने हा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
पिंपरी चिंचवड येथील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी कोविड ....
अधिक वाचा