ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 13, 2020 09:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

शहर : मुंबई

हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळे आज तब्बल 5 राज्यामध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगनासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलामुळे मंगळवारी तेलंगणात मुसळधारते अतिमुसळधार (heavy to very heavy falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर वादळात झालं आहे. यामुळे मंगळवारी देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. यावेळी 55-65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर नंतर याचा वेग 75 किमी तासापर्यंत वाढू शकतो. यावेळी समुद्री भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो असं हवामान खात्यानं म्हटलं

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळपर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनारपट्टी भागात समुद्राची वादळी परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत मच्छिमारांना समुद्रावर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.

 

मागे

MMR क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश
MMR क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश

सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित झाल्या....

अधिक वाचा

पुढे  

खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू, राजेश टोपेंचा इशारा
खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू, राजेश टोपेंचा इशारा

जीसीसी या कंपनीच्या टेस्टिंग किट महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात दिल्या अस....

Read more