By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 04:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळी पाऊस होऊ शकतो.
शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं वातावरण बदललं आहे. मान्सून परतल्याची बातमी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून या बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी (21 ऑक्टोबरला)मतदानाच्या दिवशीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई उपनरांसह, ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. असाच पाऊस सोमवारीही होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या पश्चिम प्रभागाचे सहसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
मोसमी पाऊस परतल्यानंतरही पावसाळा सुरू असण्यामागे हे कारण आहे. मंगळवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
कुठे आहे Alert?
पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही होऊ शकतो.
त्यासाठी इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सोमवारी - मतदानाच्या दिवशीची पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात विजांसह पाऊस
मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर पाऊसधारा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात पुढचा आठवडाभर हवामान ढगाळ राहणार असून काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-तालुक्यातील उजनी पाटी येथे झालेल्या रेर्कार्डबे्रक....
अधिक वाचा