By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 05:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : patna
शासकीय अधिकारी यांनी जीन्स आणि टी-शर्ट न घालता फॉर्मल ड्रेसवरच कार्यालयात यावे असे फर्मान बिहारचे अवर सचिव शिव महादेव प्रसाद यांनी काढले आहे. इतकेच काय पण सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी भडक रंगाचे कपडे घालू नयेत, असेही बजावण्यात आले आहे.
राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन संस्कृती विरुद्ध असे कॅज्युअल ड्रेस परिधान करून कार्यालयात येवू शकत नाहीत. कॅज्युअल ड्रेस हा कार्यालयीन प्रतिष्ठेच्या विरुद्ध असल्याचेही सचिवांनी म्हटले आहे. म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी कार्यालयात औपचारिक, सौम्य रंगाचे शालीन, प्रतिष्ठा असलेले आरामदायक, सर्व सामान्यपणे समाजात परिधान करण्याजोगे असे कपडे परिधान करून कार्यालयात यावे असे आदेशात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 3 वर कल्याणहून आलेली धीमी ल....
अधिक वाचा