By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 05, 2019 09:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक कोलमडली होती. वसई ते विरारमधील पाणी पातळीत झालेली वाढ तसेच पॉइंटच्या अकार्यक्षमतेमुळे वसई विरार दरम्यानची वाहतूक थांबविण्यात आलेली होती. सकाळी 11.11 मिनिटाच्या दरम्यान वाहतूक पुन्हा चालू करण्यात आली होती मात्र सातत्याने होणार्या पावसामुळे आणि 300 मिमीच्यावर पाणी साचल्यामुळे पूर्णपणे लोकल आणि एक्सप्रेस वाहतूक फेर्या बंद ठेवण्यात आल्या. तसेच माहीम माटुंगा दरम्यान ही पाणी पातळी वाढल्यामुळे ट्रेन रद्द केल्या गेल्या होत्या. संध्याकाळी उशिराने जलद गतीच्या लोकल अप आणि डाउन मार्गावर चालवण्यात आल्या होत्या. दिवसभर फलाटावर गाडीची वाट बघत थांबलेल्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने गाडी पकडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
रात्री उशिराने विरारसाठी गाड्या सुरू करण्यात आल्या. आज सकाळी सर्व चारही लाइनच्या लोकल गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू असून 5 ते 10 मिनिटांचा फरकाने वाहतूक सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.
05.09.19, 09.30 hrs, #WRUpdates. WR suburban services are running on all lines without any disruption though with a delay of 5-10 mins. Long distance trains to run normal ex Mumbai. @drmbct @RailMinIndia
— Western Railway (@WesternRly) September 5, 2019
1 सप्टेंबर पासून लागू झालेल्या मोटार वाहन कायदा 2019 च्यानुसार दंडाची रक्कम ....
अधिक वाचा