ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात लॉक डाऊन लागू होणार का?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात लॉक डाऊन लागू होणार का?

शहर : मुंबई

चीनमधील वुहानमधून कोरोना व्हायरस जगभर पसरला. जगभरात आता कोरोनाने थैमान मांडला आहे. देशातून आता कोरोनाने वेगवेगळ्या राज्यात प्रवेश केला आहे. असं असताना महाराष्ट्रात कोरोनाने दुबईतून आलेल्या दाम्पत्यामार्फत प्रवेश केला. दुबईतून आलेल्या लोकांमार्फत कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाचे तब्बल ३९ रूग्ण सापडले असून एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस हा दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. यामुळे सरकार सावध झालं आहे. अनेक महत्वाचे निर्णय सरकारकडून आतापर्यंत घेण्यात आले आहेत. मात्र सरकार आता 'लॉक डाऊन'च्या निर्णय घेईल का? याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.

महाराष्ट्रात सध्या महत्वाची अंमलबजावणी करण्यात आली. यातून सदृश्य लॉक डाऊन पद्धत स्विकारली जात आहे. यामध्ये  सर्व शाळा आणि विद्यापीठांसह रेस्टॉरंट्स, बार आणि इतर अनावश्यक किरकोळ दुकानं बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, जिम, जलतरण तलाव बंद केले असून, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

गर्दी कमी व्हावी यासाठी कलम १४४ जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. घरातून कार्यालयीन काम करणे, शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याची सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. या उपाययोजना अपुऱ्या ठरल्या, तर पुढील काही काळात सार्वजनिक वाहतूकही बंद केली जाऊ शकते.

'लॉक डाऊन' म्हणजे नक्की काय?

'लॉक डाऊन' हा पर्याय अतिशय दुर्मिळ वेळा स्विकारला जातो. यामध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे स्तलांतरीत केलं जातं किंवा घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. हा निर्णय किती कालावधीसाठी घ्यायचा हे त्या स्थितीवर अवलंबून असतं. सध्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाबाबत कोणताच विचार केला नसल्याचं दिसतंय. मात्र, रुग्णांची संख्या वाढली, तर 'लॉक डाऊन महाराष्ट्रात लागू केला जाऊ शकतो. यामध्ये सर्व व्यवहार ठप्प केले जातील. वाहतूकीवर पूर्णपणे बंदी येईल. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहणं गरजेचं आहे. यावेळी वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतात.

मागे

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्य....

अधिक वाचा

पुढे  

Coronaमुळं शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद
Coronaमुळं शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी प्रशा....

Read more