By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 08:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना टाळं असणार आहे. तसेच, कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.
जनता कर्फ्यूदरम्यान काय करावं आणि काय करु नये?
भारतात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 315 वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4 लोकांचा जीव या विषाणूने घेतला आहे. या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. यादरम्यान, काय करावं आणि काय करु करु नये हे जाणूण घ्या.
1. घरातच राहा, बाहेर पडू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार, रविवारी आज 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडू नका. एवढंच नाही, तर सोसायटीतही फिरु नका. गार्डन सुरु नाहीत, त्यामुळे तिकडेही जाऊ नका. घरातल्यांशिवाय इतर कुणालाही भेटू नका.
2. घराबाहेर कधी निघता येणार
कोणत्याही प्रकारची वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आली, तरच तुम्ही घरातून बाहेर पडू शकता. तसेच, रुग्णालयात जाणाऱ्यांना कुणीही थांबवणार नाही. मात्र, अत्यावश्यक गरज नसेल तर बाहेर पडू नका. याशिवाय, तुमच्या आसपासच्या दुकानात आवश्यक असल्यास जाऊ शकता.
3. कोण-कोण घरातून बाहेर निघू शकतं?
पोलीस, मीडियाचे प्रतिनिधी, डॉक्टर आणि सफाई कर्मचारी यांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण त्यांचं काम अत्यावश्यक सेवांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, “या सर्वांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी घरातून बाहेर पडणं आवश्यक आहे.”
4. सायंकाळी 5 वाजता टाळी, थाळी किंवा घंटा वाजवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयाना आवाहन केलंय की, डॉक्टर, पोलीस, माध्यम प्रतिनिधी, सफाई कर्मचारी, होम डिलिव्हरी करणारे यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी दरवाजा, खिडकीत उभं राहून सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळी किंवा घंटी वाजवावी. याशिवाय त्यांनी राज्य सरकारांना आवाहन केलं की सर्व शहरांमध्ये सायरन वाजवून जनतेला याची आठवण करून द्यावी.
5. हात धूत राहा
रविवारी जनता कर्फ्यूच्या काळात तुम्ही तुमच्या घरी असले तरी सतत हात धुवायला विसरु नका. सतत हात धूत राहा. किमान प्रत्येक अर्ध्या तासाला हात स्वच्छ धुवा.
मुंबईत काय सुरु राहणार?
सरकारी आणि खासगी रुग्णालय
औषधं दुकाने
किराणा दुकाने
दूध डेअरी
सरकारी कार्यालय (फक्त 25 टक्के कर्मचारी )
रेल्वे, बेस्ट बस
मुंबईत ‘या’ सुविधा बंद?
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद
मोठे मॉल बंद
जिम , जलतरण तलाव
सिनेमागृह
मुंबई पुणे ट्रॅव्हल बंद
खासगी कम्पन्या बंद
शाळा कॉलेज
मोठ्या चौपट्या बंद
उद्यान बंद
लग्नाचे हॉल काही प्रमाणात बंद
मच्छीमार्केट बंद
मुंबईतील छोटी मोठी मंदिरे बंद
भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरात कोरोनाच्या ....
अधिक वाचा