ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऐन निवडणूक काळात 2000 च्या नोटा गायब? आरबीआयसह बँकाही शोधात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 04:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऐन निवडणूक काळात 2000 च्या नोटा गायब? आरबीआयसह बँकाही शोधात

शहर : delhi

मध्यंतरीच्या काळात या 2000 च्या नोटा बंद होणार असल्याची अफवा उठली होती. कारण त्या बाजारात चलनातून हळूहळू कमी होत होत्या. तेव्हा खुद्द रिझर्व्ह बँकेनेच या नोटा बंद होणार नसल्याचे सांगितले होते. आता निवडणुक काळात या नोटाच चलनातून गायब झाल्या आहेत. याचे गौडबंगाल काय, या विचारात आरबीआय आणि बँका पडल्या आहेत. 
लोकसभा निवडणुकीत काळेधन रोखण्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. मात्र, बाजारात 2000 च्या नोटाच दिसायच्या बंद झाल्या आहेत. यामुळे या नोटा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनुसार जवळपास 50 टक्के नोटा बाजारात खेळत्या आहेत. तर बँकांमध्ये केवळ 500 आणि 200 रुपयांच्याच नोटांचे येणे-जाणे सुरु आहे. यामुळे 2000 च्या नोटांचा काळाबाजार तर होत नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. 
कानपूरच्या अनेक करन्सी चेस्टमध्ये 2000 च्या बोटा नावालाच उरल्या आहेत. या नोटा ना रिझर्व्ह बँकेकडे आहेत, ना ही बँकांकडे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासूनच या नोटांची जमाखोरी सुरुझाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा परिणाम बँकांच्या व्यवहारावर होताना दिसत आहे.

मागे

पाकिस्तानमध्ये गुजरातच्या 22 मच्छिमारांना अटक 
पाकिस्तानमध्ये गुजरातच्या 22 मच्छिमारांना अटक 

पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने कुरापती चालूच ठेवताना बुधवारी गुजर....

अधिक वाचा

पुढे  

आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका; मुख्यमंत्री
आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका; मुख्यमंत्री

दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या ....

Read more