ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 09, 2020 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई

शहर : पुणे

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणता होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे नाक आणि तोंड झाकणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच लॉकडाऊनही कडक करण्यात आले आहे. आवश्यक सेवा वगळता सर्वांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जर यापुढे रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आला तर त्याला अटक करण्यात येईल, अशा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह ज्या ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तिथे मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती दिली.

मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (एमएमआर) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (पीएमआर) नाशिक आणि नागपूर येथील सर्व शासकीय सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रवेश ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीत चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अन्शु सिंन्हा यांनी काढले आहे. त्यामुळे आता राज्यात मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना विषाणुचा (COVID-19) प्रसार होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्यासंबंधीच्या विविध सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोरोना हा संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मास्क घालण यापुढे बंधनकारक करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र, नाशिक आणि नागरपूर  तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  लक्षात घेऊन शासकीय कार्यालयामध्ये हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ही सूचना केली आहे.  मास्क न घालणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणारनसून पुढील आदेश येईपर्यंत ही सूचना लागू राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. 

मागे

वरळीचं एनएससीआय स्टेडियम आता क्वारंटाईन वॉर्ड
वरळीचं एनएससीआय स्टेडियम आता क्वारंटाईन वॉर्ड

मुंबईत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेनं आता मोठ्या संकटा....

अधिक वाचा

पुढे  

Coronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७
Coronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७

राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवे १६२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण....

Read more