By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 08:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चव्हाण याना मालिका पाहताना जेवण करणं चांगलंच महागात पडलंय. मालिका पाहत असताना त्या एवढ्या रमल्या, की तीन सेमीचा चिकनचा तुकडा त्यांच्या घशात आणि त्यानंतर अन्ननलिकेत अडकला. त्यांना श्वास घेण्यासाठीही त्रास होऊ लागला. अखेर रुग्णालयात दाखल करावं लागलं. कुर्ला कोहिनूर हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. घशात अडकलेले हाड पाहण्यासाठी लगेचच त्यांच्या मानेची आणि छातीची चाचणी केली. सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेला छेद गेल्याचं दिसलं नाही. अखेर 14 तासानंतर तज्ञ डॉक्टरांनी हा तुकडा काढण्यात यश मिळवलं.
भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अ....
अधिक वाचा