By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 10:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : pandharpur
पंढरपूर : आज मकरसंक्रांती दिवशी सावळ्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहास रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आले आहे. तसेच या सजावटीसाठी पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये मोगरा, अस्टर, जरबेरा, झेंडू, तुळस, ब्लू डायमंड अशा फुलांचा समावेश केला आहे. रुक्मिणीमातेस सुवर्ण अलंकारही परीधान करण्यात आले आहे.
रुक्मिणीमातेस तयार करण्यात आलेले मुकुट आणि गळ्यातील हार तसेच हलव्यापासून बनवलेले खास तिळगुळ तयार केले आहे. संक्रांतीनिमित्ताने प्रसिद्ध असलेले पंढरपूरातील देवस्थान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेले लाखो भक्तांची येथे गर्दी झाल्याची दिसत आहे.
दर्शनासाठी आलेले महिला भाविकांना दर्शन घेण्यासाठी पूर्ण व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे तर पुरुष भाविकांना मुखदर्शन करण्याचे आवाहन मंदिराच्या प्रशासनाने केले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'गंगुबाई काठी....
अधिक वाचा