ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोण होणार भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'?

शहर : देश

         नवी दिल्ली - भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (Chief of Defence Staff) पदासाठी नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. भारतातल्या तिनही सैन्य दलांपैकी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची या महत्त्वपूर्ण पदावर वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता आहे. या महिन्याच्या अखेरीला निवृत्त होत असलेले जनरल बिपीन रावत यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.


         'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना केली होती. तिन्ही सैन्यदल आणि संरक्षण मंत्रालय, तसंच पंतप्रधान यांच्यात सुसूत्रता आणि समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' यांच्यावर असणार आहे. 


          गृह मंत्रालयाची आज या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. एनएसए अजित डोभाल यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या काय काय जबाबदाऱ्या असतील यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या कॅबिनेट कमिटीला (CCD) एक अहवाल सादर केलाय. कॅबिनेटनं या रिपोर्टला मंजुरी दिलीय. 


         चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस सरकारसाठी सैन्य सल्लागार म्हणून काम पाहतील. पंतप्रधान आणि सुरक्षा मंत्र्यांना रणनीती ठरवून देण्याचं काम सीडीएसकडे असेल. देशात पहिल्यांदाच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची नियुक्ती होणार आहे. 


        संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांचं नाव सीडीएससाठी आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, हे पद 'फोर स्टार' असेल आणि सीडीएस सैन्य प्रकरणातील विभागांचे प्रमुख असतील.
 

मागे

२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा
२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

             अफगाणिस्तान - दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करण्या....

अधिक वाचा

पुढे  

दोन टीसींना प्रवाशांकडून बेदम मारहाण
दोन टीसींना प्रवाशांकडून बेदम मारहाण

          मुंबई - एकाच दिवशी रेल्वेच्या तिकिट दोन तपासनिकांना बेदम मारह....

Read more