ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंदिर वहीं बनाएंगे.. ‘या’ व्यक्तीने लिहिलं होतं घोषवाक्य; जे बनलं राम मंदिर आंदोलनाचं प्रतीक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 22, 2024 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंदिर वहीं बनाएंगे.. ‘या’ व्यक्तीने लिहिलं होतं घोषवाक्य; जे बनलं राम मंदिर आंदोलनाचं प्रतीक

शहर : देश

अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. हे मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे. मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाती 'मंदिर वहीं बनायेंगे' या घोषवाक्य कुणी लिहिलं? पाहा...

अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन आज होतंय. या सोहळ्याला असंख्य रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. राम मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे.

राम मंदिर आंदोलनातील 'राम लल्ला हम आयेंगे मंदिर वहीं बनायेंगे' हे घोषवाक्य कुणी लिहिलं? हे तुम्हाला माहिती आहे का?

मूळ मध्यप्रदेशमधील असलेल्या बाबा सत्यनारायण मौर्य यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली आहे. मौर्य यांनी 1986 साली त्यांनी ही घोषणा दिली. तेव्हा ते केवळ 22 वर्षांचे होते .

मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये त्यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली. मोर्य हे पेंटर आहेत. कार सेवेसाठी गेलेले असताना अयोध्येमधील भिंतीवर त्यांनी ही घोषणा लिहिली.

अयोध्यतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात 6 हजार व्हीआयपी लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातील एक म्हणजे बाबा सत्यनारायण मौर्य आहे. पंतप्रधान मोदी त्यांना व्यक्तिगतरित्या ओळखतात. आजच्या या सोहळ्याला मोर्य हजर आहेत.

 

मागे

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिले दर्शन
अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिले दर्शन

अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनि....

अधिक वाचा

पुढे  

 राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने काय पाठवलं? अन्य राज्यांच योगदान, जाणून घ्या….
राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने काय पाठवलं? अन्य राज्यांच योगदान, जाणून घ्या….

विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय, त्यावरुन पंतप्रधान नरे....

Read more