ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी,तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 26, 2020 07:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी,तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल

शहर : पुणे

प्रत्येक भारतीयापर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी रुपये आहे, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? असा थेट प्रश्न पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. शनिवारी टि्वटरवरुन अदर पूनावाला यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत हा सवाल केला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे.

काय आहे अदर पूनावाला यांचे ट्वीट?

पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे असे अदर पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी आरोग्य मंत्रालय आणि पीएमओ इंडियला टॅग केलं आहे.

मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण, तशी आपल्याला योजना आखावी लागेल. आपल्या देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल असे अदर पूनावाला यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी 2024 पर्यंत वाट पाहावी लागणाार - सीरम इन्स्टिट्यूट

जगभरात कोरोनाचं संकट वाढत असताना आता लस कधी येणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. काही कंपन्यांनी असा दावा केला आहे की या वर्षात कोरोनावरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तर काहींनी लस पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल असा दावा केला आहे. तर सीरम इन्स्टिट्युटने कोरोनावरील लस 2024 च्या शेवटी सर्वांना उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.

मागे

Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस
Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस

खऱ्या अर्थाने आज मुंबईत कोरोना विरोधातील लशीचा अनुभव 'मुंबईकरांनी' घेतल....

अधिक वाचा

पुढे  

तब्बल 6 महिन्यांनी सुरु होतेय लेडीज स्पेशल!
तब्बल 6 महिन्यांनी सुरु होतेय लेडीज स्पेशल!

पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक सेवेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक आ....

Read more