ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकरे सरकार अॅक्सिस बँकेतील 'ती' खाती वळवणार?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकरे सरकार अॅक्सिस बँकेतील 'ती' खाती वळवणार?

शहर : मुंबई

              मुंबई - महाराष्ट्रातील सत्तापालटाचा फटका ‘अॅक्सिस बँके’सारख्या खाजगी क्षेत्रातील देशात ‘टॉप 5’मध्ये असलेल्या बँकेलाही बसण्याची शक्यता आहे. पोलिस विभागाची वेतन खाती (सॅलरी अकाऊण्ट्स) अॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली (Axis Bank Salary Accounts) ठाकरे सरकारने सुरु केल्या आहेत. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची चिन्हं आहेत. 


              महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अॅ क्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.


               सत्तापालटानंतर महाविकास आघाडी सरकारकडून ही खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसारखा मोठा ग्राहक ‘अॅक्सिस’च्या अॅक्सेसबाहेर जाणार आहे. महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक खात्याला मंत्री मिळाल्यानंतर हा बदल करण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे.


             केवळ राष्ट्रीयकृत बँकांद्वारे वेतन आणि अनुदान वितरणाच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना पुष्टी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार ही खाती वर्ग करण्यात आल्याचा दावा करत नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ऑगस्टमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) याचिका दाखल केली होती. अमृता फडणवीस अॅेक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत.


              या हस्तांतरणाचा फायदा ‘अॅ्क्सिस बँके’ला झाला, मात्र स्टेट बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला, असा दावा जबलपुरे यांनी केला. मार्च 2005 मध्ये म्हणजेच अमृता यांच्याशी लग्न होण्याच्या आठ महिने आधीच ही खाती अॅक्सिस बँकेत उघडली गेल्याचा दावा, देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर, फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने त्यावेळी केली होती.


           ‘अॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.


           ‘अॅेक्सिस बँक ही देशातील एक जबाबदार बँकिंग आणि वित्तीय संस्था आहे. सैन्य आणि पोलिस या दोन्ही गणवेशधारक दलांची सेवा करणे हे अॅेक्सिस बँकेचं लक्ष्य तर आहेच, पण अभिमानास्पद बाबही आहे. आम्ही देश आणि राज्यांमध्ये गुंतवणूक करत राहू’ असं अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी पत्रक काढून म्हटलं आहे.
 

मागे

खर्च परवडत नसल्यानं बँकांच्या एटीएमची संख्या निम्म्यावर
खर्च परवडत नसल्यानं बँकांच्या एटीएमची संख्या निम्म्यावर

           औरंगाबाद - पैसे काढण्यासाठी तुम्ही आम्ही सर्रास एटीएमचाच वा....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांनो जर रस्त्यावर कचरा टाकत असाल तर सावधान
मुंबईकरांनो जर रस्त्यावर कचरा टाकत असाल तर सावधान

          मुंबई - शहरात पोलीस विभागाकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची ....

Read more