ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वादळी पावसाचा सोलापूरला पुन्हा एकदा फटका

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 01:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वादळी पावसाचा सोलापूरला पुन्हा एकदा फटका

शहर : सोलापूर

पंढरपूर तालुक्‍यातील अनेक भागात काल (ता. ०४) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. परिसरात या वादळाचा जोर मोठा होता, वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने आंबा, द्राक्ष, भाजी पाला, लिंबू आदींचे मोठे नूकसान झाले, तर अनेक ठिकाणी झाडे पडली. अनेक ठिकाणी जोरदार वार्‍यामुळे जनावरांच्या पत्रा शेड उडून पडल्याने जनावरांचे हाल झाले. गुरूवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. मात्र दुपार नंतर अकाशात ढगाळ वातावरण पहावयास मिळाले. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच वादळी वारे आणि  वार्‍याचा जोर जास्त असल्याने परिसरातील झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, ठिकठिकाणी झाडे कोलमोडली, आंबा, द्राक्ष, भाजीपाला, केळी, लिंबू आदी पिकांना या अवकळी पावसाचा मोठा फटका बसला. या परिसराला एक दिवस आधीच असाच वादळी वार्‍याचा फटका बसला होता. यातून शेतकरी सावरत नाही तोपर्यंत, दूसरा फटका बसल्याने शेतकरी आणि जनता घाबरली आहे. मोठ मोठ्याने विजा कडकडून पाऊस झाल्याने ग्रामिण भागात पावसा विषयी दहशत निर्माण झाली. विजांचा लपंडाव रात्री बारावाजेपर्यत सुरू होता. पंढरपूर येथील लक्ष्मी टाकळी, कोर्टी परीसरासह अनेक गावाला पावसासह गारपीट झाली. यामध्ये शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्‍याने शेतकरी चिंतेत आहेत.

मागे

बीएसएनएलच्या ५४ हजार ४५१ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार
बीएसएनएलच्या ५४ हजार ४५१ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार

आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या बीएसएनएलला सावरण्यासाठी बीएसएनएलने त्य....

अधिक वाचा

पुढे  

मी सुबोध भावेंसारखा दिसतो – राहुल गांधी
मी सुबोध भावेंसारखा दिसतो – राहुल गांधी

मी सुबोध भावे यांच्यासारखा दिसतो असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पु....

Read more