By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 01, 2020 07:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना विषाणूने जगभरात थैमान माजवला आहे. या विषाणूशी लढण्यासाठी देशातील संपूर्ण कॉर्पोरेट जगत पुढे सरसावलं आहे. कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची सुरुवात केली. आतापर्यंत या फंडमध्ये हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यादरम्यान, व्यावसायिक अजीम प्रेमजी यांच्या विप्रो समुहाने कोरोनाशी लढा लढण्यासाठी 1,125 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, समुहाने ही रक्कम सध्या पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्याची घोषणा केलेली नाही. विप्रो त्यांच्या संस्थेद्वारे हे पैसे खर्च करणार आहेत.
कंपनीने काय म्हटलं?
विप्रो समुहाने बुधवारी एक वक्तव्य जारी केलं, “कोविड-19 पासून निर्माण झालेल्या अभूतपूर्व आरोग्य आणि मनवी संकटाला पाहता विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्रायझेस आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशन मिळून 1125 कोटी रुपये खर्च करतील. हा पैसा कोरोनाग्रस्त परिसरातील मानवी सहायता, चांगल्या आरोग्य सुविधांसाठी खर्च केला जाईल.”
कंपनीनुसार, या 1,125 कोटी रुपयांपैकी 100 कोटी रुपये विप्रो लिमिटेड, 25 कोटी रुपये विप्रो एंटरप्रायझेस आणि 1000 कोटी रुपये हे अजीम प्रेमजी फाऊंडेशनद्वारे दिले जातील.
पीएम केअर्स फंड
कोरोना विषाणूच्या लढ्यात मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची घोषणा केली. त्यानंतर देशातील अनेक उद्योगपतींनी आणि सिनेकलाकारंनी भरघोस मदत केली आणि करत आहेत
कोणाकडून किती मदत?
शिर्डी साईबाबा ट्रस्ट – 51 कोटी
CRPF अधिकारी – 33.81 कोटी
मुकेश अंबानी – 5 कोटी
अभिनेता प्रभास – 4 कोटी
बॉक्स ऑफिस इंडिया – 3 कोटी
अल्लू अर्जुन – 1.25 कोटी
अभिनेता पवनकल्याण – 1 कोटी
सचिन तेंडुलकर – 50 लाख
शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
भाजप आमदार – एक महिन्याचा पगार
अभिनेता अक्षय कुमार – 25 कोटी
रतन टाटा – 500 कोटी
कोरोना व्हायरसमुळे सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातले सर्व व्यवहार ठ....
अधिक वाचा